भाजपा महिला मोर्चाच्या वतीने 'माता सुरक्षीत - घर सुरक्षीत' अभियान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील महिलांची तपासणी.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत संपुर्ण राज्यात महिलांसाठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. वेंगुर्ले तालुक्यातही आरोग्य केंद्रात तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी अशा तपासणी शिबीराचे आयोजन करुन महिलांसाठी समुपदेशनाचे काम करण्यात येत आहे.
शासनाच्या या उपक्रमात सहभागी होत भाजपा महिला मोर्चाने वेंगुर्ले तालुका कार्यालयात अशाच प्रकारे महिला तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.
तपासणी शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी नगरसेविका श्रेया मयेकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व स्टाफचे गुलापपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.स्वप्नाली माने – पवार, आरोग्य सेविका तांडेल , आरोग्य सेवक एस्. एस्. झालबा, हिंद लॅबच्या निलिमा भाटकर, ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ. श्रवण कुमार इत्यादी वैद्यकीय टीम ने सर्व महिला, माता व गरोदर स्त्रियांची मोफत तपासणी करून समुपदेशन केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुषमा खानोलकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर, महिला ता.सरचिटणीस वृंदा गवडंळकर, रसीका मठकर, आकांक्षा परब, केतकी खवळे, सौ.मराठे इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)