भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय….!
क्रिडा | ब्यूरो न्यूज :
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने विराट कोहलीच्या जिगरबाज अर्धशतकी (नाबाद ८२ धावा) खेळीच्या जोरावर पाकिस्तानला धूळ चारत शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला. हा सामना रंगतदार झाला. पाकिस्तानने २० षटकात १५९ धावा केल्या. १६० धावांचे लक्ष्य घेवून खेळताना भारताचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत असताना विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने शानदार फलंदाजी केली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर एका धावेची आवश्यकता असताना आर. आश्वीनने मिडआँफवरून फटका मारत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)