वायंगवडे ग्रामपंचायतीच्या वतीने पोषण आहाराचे वाटप...!
मसुरे | प्रतिनिधी :
वायंगवडे ग्रामपंचायत येथे गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित मुले यांना पोषण आहाराचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी सरपंच आनंद सावंत, उपसरपंच सत्यवान आंगणे, ग्रामसेवक श्री कृष्णाजी दळवी, सदस्य सौ. सीता मेस्त्री, गीतांजली पवार, प्रतीक्षा घोगळे, रमेश वायंगवडेकर, ग्रामसेवा संघ अध्यक्ष -अदिती सावंत, गावातील ग्रामस्थ, महिला समूह गटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत डेटा ऑपरेटर सुकन्या सचिन जाधव यांचा ओट भरणी कार्यक्रम यावेळी करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)