भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा आज कुडाळमध्ये उत्साहात साजरा होतोय वाढदिवस.
माजी खासदार निलेश राणे व सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची असणार मंचावर.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा युवा नेते व उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस आज कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृह उद्यम नगर हॉटेल आरएसएनच्या पाठीमागे होत आहे.
या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय नव्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे अशी चर्चा आहे.
उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्योग मंत्री उदय सामंत,भाजपचे माजी खासदार तथा प्रदेश सचिव निलेश राणे व उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने महाराष्ट्रात नव्या राजकीय मैत्रीचे पर्व यानिमित्ताने सुरू होणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
त्यामुळे एकेकाळीचे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणार असल्याने तळकोकणातील राजकीय समीकरणेच या निमित्ताने बदलून जाणार आहेत.
ही समीकरण बदलल्यास रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपची ताकद वाढणार आहे. तर कुडाळ मालवण मधून भाजपचे निलेश राणेंची ताकद मजबूत होणार आहे.
तर रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी सह पाचही विधानसभा मतदारसंघात भाजपची आणि शिंदे गटाची ताकद यामुळे दुप्पट होणार आहे.
माजी खासदार निलेश राणे आणि ना. उदय सामंत व किरण सामंत यांच्या मैत्रीचे नविन पर्व या निमित्ताने सुरू होणार आहे.
या कार्यक्रमाला माजी खासदार निलेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत,उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत,सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली,माजी आमदार प्रमोद जठार यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)