ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
भाजप आणि “अंत्योदय प्रतिष्ठान”च्या माध्यमातून कोविड सेंटरचे  लोकार्पण

भाजप आणि “अंत्योदय प्रतिष्ठान”च्या माध्यमातून कोविड सेंटरचे लोकार्पण

प्रकाशन: 07 Sep 2021 02:08 PM
वाचन संख्या 214

९ सप्टेंबरला लोकार्पण

भाजप आ.प्रसाद लाड माहिती

उमेश परब /कणकवली : कोविडची तिसरी लाट येणार असल्याचे सरकारने जाहीर केले,परुंतु कंत्राटी आरोग्य कर्मचारी कमी केले आहेत.अनेक कोविड सेंटर बंद केलीत.त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सिंधुदुर्ग व”अंत्योदय प्रतिष्ठान”च्या माध्यमातून कोविड सेंटरचे ९ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन कोविड सेंटरचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नारायण राणे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होईल अशी माहिती आ.प्रसाद लाड यांनी दिली.

या कोविड सेंटर संदर्भात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची आम्ही भेट घेतली. ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातून या तीनही कोविड सेंटरचे लोकार्पण होणार आहे. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,माजी खासदार निलेश राणे, माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, आमदार भाई गिरकर, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्ग येथील केंद्रे आयुर्वेदिक कॉलेज, सावंतवाडी; ग्रामीण रुग्णालय, देवगड; पॉलीटेक्निकल कॉलेज, मालवण येथे उभारली गेली आहेत.ही केंद्रे भाजपचे आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, रमेश पाटील आणि प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून उभारली गेली आहेत. त्यांना सौ.नीता प्रसाद लाड यांच्या ‘अंत्योदय प्रतिष्ठान’नेही आर्थिक हातभार लावला आहे.

सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना तीन महिन्यांपूर्वी येथील जनतेला आश्वासन दिले होते. कोविड-१९ रुग्णालये उभारून या जिल्ह्यांच्या विविध भागांमध्ये आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणवर सुधारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्या आश्वासनांची पूर्तता या रुग्णालय आणि कोविड केंद्रांच्या माध्यमातून केली जात आहे. विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने ही केंद्रे उभारली गेल्याचे श्री. लाड यांनी सांगितले.

“ज्या ज्या वेळी कोकणावर संकट आले तेव्हा भाजप कोकणवाशीय बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे ऊभी राहिली आहे. नुकत्याच झालेल्या महापुराच्यावेळीसुद्धा हीच बाब प्रकर्षाने नमूद झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उभारणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील काही याधीही दाखल झाल्या असून नवीन रुग्णालय व केंद्रांच्या माध्यमातून पुढील टप्पा या आठवड्यात पूर्ण होत आहे. आणखीही आरोग्य सुविधा आम्ही पुढील टप्प्यात दाखल करणार आहोत. कोविडची तिसरी लाट येवू नये, अशीच प्रार्थना ईश्वरचरणी राहील. पण ती आलीच तर या आरोग्य सुविधा महत्वाची कामगिरी पार पाडणार आहेत,” असे आ.प्रसाद लाड यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स