बांदिवडे येथील प्रसिद्ध मुर्तीकार तुकाराम मेस्री यांचे निधन
विवेक परब / आचरा :बांदिवडे पंचक्रोशील उत्कृष्ट मूर्तीकार म्हणून प्रसिध्द असलेले तुकाराम बा. मेस्री यांचे बांदिवडे येथे राहत्या घरी काही दिवसापूर्वी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षाचे होते. पंचक्रोशीत उत्कृष्ट मूर्तीकार व चित्रकार तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून ते प्रसिध्द होते. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे चित्रकार म्हणून काम करत असलेले रुपेश मेस्री यांचे व चित्रकार राकेश मेस्री यांचे ते वडील तर मूर्तीकार वसंत मेस्री यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनाने एक उत्कृष्ट मूर्तीकार हरपल्याची खंत व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)