ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
भारतीय संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

भारतीय संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

प्रकाशन: 06 Sep 2021 09:36 PM
वाचन संख्या 212

१५७ धावांनी जिंकली कसोटी

द. ओव्हल (लंडन) | क्रिडा वृत्त : पाच कसोटी सामन्यांच्या एल व्ही इन्शुरन्स कसोटी मालिकेत भारताने इंग्लंड संघावर सनसनाटी विजय मिळवून इतिहास रचला. बरोब्बर पन्नास वर्षांपूर्वी याच मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडवर पहिला कसोटी विजय मिळवला होता.
मागील सामन्यांतील पराभवानंतर आणि याही सामन्यांतील पहिल्या डावातील निराशाजनक खेळानंतर पिछाडीवरुन येत भारताने हा रोमहर्षक विजय मिळवला.
शार्दुल ठाकूरची दोन्ही डावात अर्धशतके आणि रोहीत शर्माचे दुसर्या डावातील महत्त्वपूर्ण शतक यामुळे हा विजय शक्य झाला आहे.
भारतीय गोलंदाजीत उमेश यादवच्या दोन्ही डावातील तीन तीन बळी महत्त्वपूर्ण योगदान देऊन गेले.
भारतीय संघाच्या या 157 धावांच्या विजयानंतर भारतीय संघ आता ही कसोटी मालिका गमावणार नाही हे स्पष्ट झाले.
आता पुढील सामना दिनांक 10 सप्टेंबरपासून ओल्ड ट्रॅफर्ड, मॅन्चेस्टर येथे खेळविला जाईल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स