ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण तर्फे 'मुक्तावकाश ते युक्तावकाश' नाट्य कार्यशाळेचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण तर्फे 'मुक्तावकाश ते युक्तावकाश' नाट्य कार्यशाळेचे आयोजन.

प्रकाशन: 14 Oct 2022 01:45 PM
वाचन संख्या 75

शनिवारी १५ ऑक्टोबरला सकाळी १० ते ५ असा कार्यशाळेचा कालावधी.

दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे संपन्न होईल कार्यशाळा.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने ‘मुक्तावकाश ते युक्तावकाश’ ही अनोखी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे.

ही कार्यशाळा दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा मालवण येथे संपन्न होईल .

नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरुपाच्या कार्यशाळा घेतल्या जातात. परंतु रंगभूमीच्या ऊत्क्रांतीबद्दल, विविध नाट्यशैलींबद्दल, त्या शैली कशा निर्माण झाल्या ?इ.स.पूर्व ३००० वर्षापुर्वीची नाट्यकला आजच्या नाट्य प्रयोगशीलते पेक्षा प्रगत होती का ? त्या वेळच्या जागतिक रंगभूमीवरील नाट्यमहर्षींनी मांडलेले नाट्यसिद्धांत काय होते ? त्याचे कार्यकारण भाव काय होते ? आणि या सर्व घटकांचा विचार करुन जगप्रसिद्ध दिग्दर्शक पिटर ब्रूक यांनी आजच्या रंगभूमीच्या संदर्भात कोणते मूलगामी विचार मांडले ?
या व अशा अनेक प्रश्नांचा उहापोह करुन पिटर ब्रूक यांच्या विचारांच्या अनुषंगाने एकूणच नाटक, अभिनय, दिग्दर्शन व कलाकृतीबद्दल सहज सोप्या शब्दांच्या शैलीत व्याख्याते श्री. अरुण कदम (लेखक, कवी, दिग्दर्शक, अभिनेते, प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार, नाट्य अभ्यासक, नाट्यसमिक्षक) या दृकश्राव्य व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळेतून रंगकर्मीच्या जाणिवा व संवेदना जागृत करण्याचं काम या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स