ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वेंगुर्ले येथे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या  कार्यकर्त्यांचा सन्मान..!

वेंगुर्ले येथे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा सन्मान..!

प्रकाशन: 13 Oct 2022 03:10 PM
वाचन संख्या 38

बांदा | राकेश परब :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना कालावधीत तसेच आतापर्यंत रक्तदान चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या ३६ कार्यकर्त्यांचा सन्मान वेंगुर्ले येथे माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.
अटल प्रतिष्ठान, किरात ट्रस्ट व माझा वेंगुर्ला या संस्थांच्या वतीने वेंगुर्ले येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोविड काळात वैद्यकीय सेवा बाजाविलेल्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, रक्तदाते यांचा सत्कार करण्यात आला.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, कार्यवाह किशोर नाचणोलकर यांच्यासह वेंगुर्ले येथील अँलिस्टर ब्रिटो, महेश राऊळ, सनी रेडकर, रुपाली परब, प्रसाद नाईक, ओरोस येथील साईनाथ आंबेरकर, डॉ.वैभव आईर, निकिता नाईक, कुडाळ येथील कल्पिता साटेलकर, यशवंत गावडे, प्रसाद वारंग, मकरंद नाईक, मंगेश प्रभू, सावंतवाडी येथील बाबली गवंडे, सिद्धार्थ पराडकर, महेश रेमुळकर, एकनाथ चव्हाण, बांदा येथील निलेश मोरजकर, अक्षय मयेकर, सुनिल गावडे, दोडामार्ग येथील भुषण सावंत, विवेकानंद नाईक, गीतांजली सातार्डेकर, संजय पिळणकर, मालवण येथील दत्ता पिंगुळकर, शिल्पा खोत, प्रा.सुमेधा नाईक, देवगड येथील विजयकुमार जोशी, प्रकाश जाधव, महेश शिरोडकर, उद्धव गोरे, कणकवली येथील अमेय मडव, तन्वी भट, अभिषेक नाडकर्णी, वैभववाडी येथील राजेश पडवळ या रक्तमित्रांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू, सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले, श्रीमती उमा प्रभू, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माझा वेंगुर्ला संस्थेचे अध्यक्ष निलेश चेंदवणकर, नकुल पार्सेकर, शशांक मराठे, सौ. सीमा मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुरेश प्रभू यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. तसेच कमी वेळेत रुग्णापर्यंत केवळ सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे तर गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई येथे तात्काळ रक्त उपलब्ध करून देण्याच्या कार्याबाबत विशेष गोरवोदगार काढलेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स