ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभागातर्फे आयोजित शिबीर उत्साहात संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभागातर्फे आयोजित शिबीर उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 13 Oct 2022 02:59 PM
वाचन संख्या 67

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कणकवली शहरातील आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Article image

या शिबिरात नियमित २०० ते २५० पर्यंत महिलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. कणकवली शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नेमून दिलेल्या जागी ही शिबिरे घेण्यात येत आहेत. कणकवली शहरातील महिलांमधून देखील या शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या शिबिराच्या निमित्ताने कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आवश्यकते प्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व महिलांना मोफत कॅल्शियमच्या गोळ्यांचे देखील मोफत वाटप केले. कणकवली नगरपंचायत व उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने संयुक्तरीत्या हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पुढाकारातून महिलांना मोफत औषधी पुरवठा केल्याने महिलांमधून देखील या उपक्रमाबद्दल कौतुकउद्गार काढण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांची विचारपूस देखील केली.

Article image

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, डॉ. सचिन वुईके, डॉ. सुहास पावसकर, डॉ. निलेश पेंडूरकर. डॉ. सूरज कुडतरकर, डॉ. तस्लिमा शेख, डॉ. आबदार, डॉ. कदम, सरस्वती नर्सिंग कॉलेज स्टुडंट, उप.जि. रुग्णा. स्टाफ श्रीम. नुपूर पवार, नयना मुसळे, श्रीम. चोडणकर, एल बी. गोसावी, श्रीम. सारिका, विद्या शिर्के, श्रीम. सावंत, श्रीम. नेहा, वैभव फाले, अभिजीत फाले, श्री. चाळके, श्री. चौरे, पी. सी. बुचडे आदी उपस्थित होते. यापुढे कणकवली शहरात आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये देखील महिलांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स