ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सरपंच सेवा संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी गुरुदास गवंडे यांची निवड...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सरपंच सेवा संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी गुरुदास गवंडे यांची निवड...!

प्रकाशन: 13 Oct 2022 03:16 PM
वाचन संख्या 30

बांदा | राकेश परब :
महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांची निवड करण्यात आली आहे. श्री .गवंडे हे सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावचे सुपुत्र असून गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत तालुका सर्व सरपंचांना संघटित करणे, मार्गदर्शन करणे आदी कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे श्री. गवंडे यांचे सावंतवाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील भरीव योगदान पाहून अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सरपंच सेवा संघ या सरपंचांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी गुरुदास गवंडे यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. दोडामार्ग सरपंच सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी श्री प्रवीण गवस यांची नियुक्ती केल्यानंतर सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी श्री गुरुदास गवंडे पदाची निवड झालेली आहे तसेच मालवण तालुकाध्यक्षपदी पळसंब गावचे सरपंच श्री चंद्रकांत गोलटकर यांची निवड झालेली आहे अन्य तालुक्यातील सरपंच सेवा संघ तालुकाध्यक्ष लवकरच जाहीर करण्यात येतील असे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री बाबासाहेब पावसे यांनी सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स