ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कासार्डे माध्यमिक विद्यालयाची शालेय निवडणूक निकाल घोषित.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कासार्डे माध्यमिक विद्यालयाची शालेय निवडणूक निकाल घोषित.

प्रकाशन: 13 Oct 2022 02:09 PM
वाचन संख्या 92

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे शालेय मुख्यमंत्रीपदी इ.१०वी तील कु. कस्तुरी अतुल मुंडले तर उपमुख्यमंत्रीपदी इ.१२वी मधील कु.कोमल शिवराम पाताडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सन.२०२२/२३ या शैक्षणिक वर्षांकरिता कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे शालेय निवडणूक अधिकारी दत्तात्रय मारकड, सहायक निरीक्षक नवनाथ कानकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षणाखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. शालेय निवडणूकीत प्रथमच दोन्ही महत्त्वाच्या पदांवर मुलींनी बाजी मारली आहे.
२०२२/२३चे शालेय मंत्रीमंडळ खालील प्रमाणे आहे.
शालेय मुख्यमंत्री : कु. कस्तुरी मुंडले, उपमुख्यमंत्री: कु.कोमल पाताडे,
सांस्कृतिक मंत्री : कु.प्राची पाळेकर , राज्यमंत्री -कु सलोनी पाताडे, कु.शिवानी जाधव, सहलमंत्री:भावेश सावंत राज्यमंत्री- रोहन पवार, जतिन लाड, क्रीडामंत्री : वैभव माने राज्यमंत्री- विश्वास चव्हाण कु.नेहा पन्हाळकर, शिस्तमंत्री : कु. प्रेरणा गाडे, राज्यमंत्री- पद्माकर सावंत कु.केतकी प्रभुदेसाई, पर्यावरण मंत्री : कु.आर्या पाताडे, राज्यमंत्री- कु.वैदही पाताडे, कु.श्रेया इंदुलकर, वाचन मंत्री : कु.प्रणाली परब, राज्यमंत्री कार्तिकी गाडे, आरोग्य मंत्री: निखिल गायकवाड राज्यमंत्री: मितेश चोरगे, स्वच्छता मंत्री: कु.पूजा बिळसकर , राज्यमंत्री -समीर तोरस्कर ,कु.स्नेहल पाताडे, पाणीपुरवठा मंत्री : मयुरेश तावडे, राज्यमंत्री -कु.तन्वी गुरव.
या नूतन मंत्रीमंडळाचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर,सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुतरकर,सर्व पदाधिकारी, शिक्षण समितीचे चेअरमन अरविंद कुडतरकर, सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य मधुकर खाड्ये,पर्यवेक्षक नारायण कुचेकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स