कणकवलीतील वसंत सावंत तथा श्री. दत्तभक्त सावंत बुवा कालवश.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली परबवाडी येथील रहिवासी व सुप्रसिद्ध श्री. दत्तभक्त वसंत महादेव सावंत उर्फ सावंत बुवा (८४ वर्षे ) यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
परबवाडी येथील दत्त मंदिरात ते नेहमी श्री. दत्त सेवेत समर्पीत असत. तेथील मंदिराची उभारणीही त्यांनी केली होती. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांची परबवाडीच्या स्मशानभूमीत वैकुंठरथातून अंत्ययात्रा काढण्यात आली.
त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश सावंत यांचे ते वडील, संकेत पाटील यांचे ते आजोबा होत.
श्री. दत्तभक्त सावंत बुवा यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)