ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सगळे लवकरच सेल्फी पाॅईंटवर नावाजणार 'दिलसे मालवण' : माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर.

सगळे लवकरच सेल्फी पाॅईंटवर नावाजणार 'दिलसे मालवण' : माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर.

प्रकाशन: 08 Oct 2022 08:58 PM
वाचन संख्या 262

लव्ह सेल्फी पाॅईंटचे लवकरच लोकार्पण होणार.

१९९० च्या दशकातील ‘I Love Malvan’ च्या बहुरंगी स्टीकर्सच्या स्मृती पुन्हा जाग्या होणार.

मालवण | सुयोग पंडित : गेल्या काही महिन्यांत मालवण शहरामध्ये पर्यटनाधिष्ठीत सुविधा व तंत्रज्ञान वाढीचे उपक्रम सुरु झाले आहेत.
बिच क्लिनिंग मशीन, बंदरजेटीवर छत्रपतींच्या शूर मावळ्यांचे आकर्षक पुतळे, काॅन्व्हॅक्स मीरर्स यांच्या सारख्या विविध सुशोभीकरणाचे प्रकल्प पर्यटक आणि स्थानिकांसाठी उपलब्ध झाले आहेत.

आता यामध्ये राॅक गार्डन मधील सेल्फी पाॅईंटचाही समावेश होत आहे.
मालवण वासियांसाठी आणि पर्यटकांसाठी मालवणची आठवण म्हणून सुशोभीत केलेल्या ‘सेल्फी पाॅईंटचे’ लवकरच लोकार्पण होणार असल्याची माहिती मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर हे जिल्ह्यातील पर्यटनाचे एक आघाडीचे शहर आहे. पर्यटन दृष्ट्या या शहराचा विकास करत असताना शहर सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने मालवण शहरात विविध ठिकाणी सुशोभीकरण साठी निधी मिळावा यासाठी आमदार वैभव नाईक यांच्याकडे आपण व आपल्या माजी नगरसेवक सहकार्यांनी मागणी केली होती. त्यानुसार आमदार साहेब यांनी पाठपुरावा करून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सांगितले आहे.
समुद्राच्या काठावर असणार मालवण नगरपरिषदचे रॉक गार्डन हे पर्यटकांच्या पसंतीचे पर्यटन स्थळ बनले आहे. डेकोरेटिव्ही लाईट, म्युझिकल फाऊंटन यामुळे लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. फोटोग्राफीचा आनंद घेतात. या पर्यटकांना मालवण कायम स्मरणात राहावे या उद्देशाने या ठिकाणी आय लव्ह मालवण हा सेल्फी पॉईंट होण्याच्या दृष्टीने सन २०२१ ला रुपये ८ लाख जिल्हा पर्यटन निधीची मागणी करण्यात आली होती आणि ३१ मार्च २०२१ ला ती मागणी रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती अशी माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिली आहे.
यासाठी आमदार वैभव नाईक यांनीही पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या नुसार प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन आता ते पूर्णत्वास आलेले आहे आणि यामुळे मालवण च्या पर्यटन सौंदर्यात भर पडलेले आहे. पर्यटकांनी या ठिकाणी सेल्फी काढल्याने मालवण शहर त्यांच्या कायम सुस्मरणात राहणार आहे.

Article image
आमदार वैभव नाईक .

पर्यायाने मालवण मालवण शहराचा पर्यटन दृष्ट्या प्रचार होण्यास मदत होणार आहे.
या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिली आहे.

Article image
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर.

मालवण शहरात १९९० च्या दशकात ‘I Love Malvan’ या वाक्याची रेडिअम स्टीकर्स शालेय वह्या, क्रिकेट बॅटस, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि रिक्षा बांधवांच्या वाहनातून सर्रासपणे आढळत असत त्याच आठवणींना आता व्यापक उजाळा देण्याचे काम हा सेल्फी पाॅईंट करणार असल्याची चर्चा आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स