ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
असलदे सरपंच श्री.पंढरी वायंगणकर आंतरराज्य आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित .!

असलदे सरपंच श्री.पंढरी वायंगणकर आंतरराज्य आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित .!

प्रकाशन: 08 Oct 2022 08:15 PM
वाचन संख्या 32

गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते झाला सन्मान.

कणकवली | ब्युरो न्यूज : यंदाचा कर्नाटक महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांचा आंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव व कणकवली तालुक्यातील असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना प्रदान करण्यात आला.
आज माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आमदार संजय पाटील, माजी खासदार अमरसिंह पाटील, कोल्हापूर माजी महापौर राजू शिंगाडे, जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघण्णावर, विलासराव पाटील, आमदार निलेश लंके, डॉ पवन शर्मा,शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.
एकूण कर्नाटक गोवा व महाराष्ट्र या तीन राज्यांतील 120 विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कार वितरण सोहळा यावेळी संपन्न झाला आहे.

यावेळीही कणकवली तालुक्यातील असल्य सरपंच पंढरी वायंगणकर यांना व ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत .याच वर्षी आपल्या भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या सरपंचांना सन्मानित करण्यात आले होते. यातही असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचाही समावेश होता.

कर्नाटक गोवा महाराष्ट्र या तीन राज्याच्या वतीने आंतरराज्य सरपंच गौरव पुरस्कार जाहीर करून प्रदान करण्यात आल्याने असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

हा सन्मान स्वीकारताना बरोबर असलदे उपसरपंच संतोष परब ,ग्रामसेवक आर.डी. सावंत, लिपिक मधुसूदन परब , तुकाराम तुप्पट आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स