ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
त्या कापुर कंपनीने मागितली जाहीर माफी ; बांदावासियांच्या त्याग आंदोलनाला भरीव यश.

त्या कापुर कंपनीने मागितली जाहीर माफी ; बांदावासियांच्या त्याग आंदोलनाला भरीव यश.

प्रकाशन: 08 Oct 2022 07:27 PM
वाचन संख्या 55

आमदार नितेश राणे यांनी दिलेला शब्द खरा केल्याबद्दल व्यक्त होतेय समाधान.

पत्रकार आशुतोष भांगले , बांदावासिय नागरीक व सरपंच अक्रम ख़ान यांनी केला होता पाठपुरावा.

बांदा | राकेश परब : अवघ्या हिंदुस्थानचे व जगातील हिंदू बंधु भगिनींचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा अपमान करणाऱ्या कापूर कंपनीने अखेर श्रीरामभक्तांची जाहीर माफी मागितली आहे. यासाठी गेलेवर्षभऱ बांदा येथे या कापराचा वापर व विक्री बंद करुन त्याग आंदोलन सुरु ठेवले होते.या आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली व त्या कापूर कंपनीला माफी मागायाला लावणार असा शब्द दिला होता.
त्यानंतर केवळ एका आठवड्यातच या कंपनीने जाहीर माफी मागितली आहे.त्याग आंदोलनाचे प्रणेते आशुतोष भांगले यांनी समस्त आंदोलकांच्यावतीने आमदार नितेश राणे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

सुमारे वर्षभरापूर्वी ही जाहीरात पाहून बांदा येथिल पत्रकार तथा बांदा श्री विठ्ठल मंदिराचे सेवक आशुतोष भांगले यांनी या कापराचा त्याग करुन हे त्याग आंदोलन सुरु केले होते. त्यांना साथ देत बांद्यातील पाच देवस्थाने,१६ व्यापारी व दोनशे सेवेकरी या त्याग आंदोलनात सहभागी झाले.कंपनीने जाहीरात बंद करावी व जाहीर माफी मागावी ही आंदोलकांची अट होती.

या आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली व ते स्वत: बांद्याला येऊन बांद्यातील व्यापारी ,भाविक व सेवेकऱ्यांना भेटले. आपल्या भेटीत त्यांनी दिलेला शब्द पाळला.दौऱ्यानंतर मुंबई येथे येताच त्यांना संबंधीत कंपनीला दणका देताच. कंपनीने तात्काळ माफी मागणारा व्हि़डियो प्रसारीत केला.कंपनीने ही जाहीरात बंद केल्याचे जाहीर केले.तसेच आपला श्रीरामभक्तांना दुखविण्याचा कोणताही हेतू नव्हता.सर्व भाविकांची आम्ही जाहीर माफी मागत असल्याचे कंपनीने प्रसारित केेलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

आशुतोष भांगले यांनी बांदा गावाला मिळालेल्या या संघटीत यशाबद्दल आनंद व्यक्त केला. आमदार नितेश राणे, बांदा सरपंच अक्रम खान तसेच सहभागी देवस्थाने,व्यापारी,सेवेकरी व भाविकांचेही जाहीर आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स