ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नेरूरमधील शिवसैनिक दसरा मेळव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर-मुंबईच्या दिशेने रवाना..!!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नेरूरमधील शिवसैनिक दसरा मेळव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर-मुंबईच्या दिशेने रवाना..!!

प्रकाशन: 05 Oct 2022 11:54 AM
वाचन संख्या 174

‘अरे आवाज कुणाचा’ घोषणांनी दूमदूमला परिसर..!!

नेरूरचा शिवसैनिक आजही ‘एकनिष्ठ’..!!

नेरूर । कुडाळ
देवेंद्र गावडे । उपसंपादक :

परिस्थिती कोणतीही असू द्या जो सदैव ‘भगव्या’शी इमान राखतो, तो खरा ‘निष्ठावंत शिवसैनिक’..!! अशा भावना व्यक्त करत आज नेरूरचे शिवसैनिक ‘दसरा मेळाव्या’मध्ये विचारांचे सोने आत्मसात करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

नेरूर हा सुरूवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. अनेक स्थित्यंतरे होऊनही हा किल्ला अभेद्य राहीला आणि याचं संपूर्ण श्रेय जात ते नेरूरमधील निष्ठावंत सर्वसामान्य शिवसैनिकांना.

शिवसेनेवरच्या..स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्मा. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच्या प्रेमापोटी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती आदर ठेवून आज देखील इथला सर्वसामान्य शिवसैनिक स्वतःची ‘पदरमोड’ करून दादर-मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर उपस्थित रहाणार आहे. अशा भावना नेरूर गावचे सरपंच शेखर गावडे यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी त्यांच्यासोबत नेरूर गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गावडे, माजी सरपंच सुनिल उर्फ पिंट्या गावडे, शिवसैनिक विनय गावडे, शिवसैनिक संदिप वारंग आदि उपस्थित होते.

यापूर्वीच कित्येक शिवसैनिक आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दाखल झाले आहेत.

मीळेल त्या वाहनाने, जसे शक्य होईल तसे आपल्या शिवसेना पक्षाची ताकद व आपल्या नेतृत्वाचे हात बळकट करण्याच्या उद्देशाने चाललेली ही सर्वसामान्य शिवसैनिकांची धडपड पाहून, त्यांचे श्रद्धास्थान असणा-या स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे ते उद्गार आठवल्याशिवाय रहात नाहीत..

‘ही शिवसेना आहे..आणि शिवसेना..केवळ माझ्या ‘निष्ठावंत’ शिवसैनिकांचीच आहे..!!’

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स