ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दामोदर नाट्यगृह शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..!

दामोदर नाट्यगृह शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..!

प्रकाशन: 05 Oct 2022 12:00 PM
वाचन संख्या 63

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
मुंबई – परळ येथील दि सोशल सर्व्हिस लीग या संस्थेच्या दामोदर नाट्यगृहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ६ ते१० ऑक्टोबर या कालावधीत शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सव कालावधीत विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल अशी माहिती दामोदर नाट्यगृह शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष आनंद माईणकर यांनी दिली.
दि सोशल सर्व्हिस लीग ही मुंबईतील १११ वर्ष जुनी सेवाभावी कार्य करणारी संस्था आहे.या संस्थेच्या दामोदर नाट्यगृहाचे हे शताब्दी वर्ष आहे.यानिमित्ताने संस्थेच्या परळ येथील ना.म.जोशी विद्यासंकुलात गुरूवारी ६ऑक्टोबरला स १०वा.या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा व यनिमित्ताने अद्वैत ही एकांकिका सादर होईल.४ वा. एकांकिका बक्षिस व सत्कार समारंभ तर सायं.७ वा. श्रीसिद्धिविनायक दशावतार मंडलांचे दशावतार सादर करतोल.
शुक्रवारी ( दि.७)रोजी स.१० वा. संस्थेचा “विद्यार्थी कलारंग” कार्यक्रम तर सायं.४ वा.लेखक प्रबोधनकार ठाकरे यांचे “खरा ब्राम्हण” यावर साजरी मनोरंजन मंडळाचे नाटक सादर होईल. खेड येथील शाहीर राजेश निकम यांचे शक्ती व लांजा येथील तुरेवाले यांचा नाच रात्री ७.३०वा.होईल.
शनिवारी (दि.८) सकाळी १०वा.कविवर्य नारायण स्मृत्यर्थ काव्यवाचन होईल.यामध्ये अरुण म्हात्रे, रामदास फुटाणे,प्रज्ञा पवार,भाई मयेकर व महेश केळुसकर सहभागी होतील.तसेच सायं.४ वा. “सरनोबत” हे ऐतिहासिक नाटक होईल.रात्री ७.३०.वा.लोकसंगीत होणार आहे. रविवार दि.९ऑक्टोबर रोजी लेखक डॉ.प्रा. प्रदीप ढवळ यांचे शिवबा हे नाटक सकाळी १०वा. होईल.उदय साटम यांच्या संकल्पनेतून “मराठी पाऊल पडते पुढे” हा वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सोमवार दि.१०ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन परिसंवाद सकाळी १० वा. होणार आहे.६ऑक्टोबर ते १०ऑक्टोबर या महोत्सव कालावधीत रंगावली प्रदर्शनही भरवले जाणार आहे.
या संपूर्ण शताब्दी महोत्सवाचे समन्वयक म्हणून श्रीमती उमा शरद शेट्ये,राजन शंकर बने व हेमंत सुधाकर सामंत हे जबाबदारी सांभाळत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स