कुडाळ तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांना आमदार वैभव नाईक यांनी दिल्या भेटी.
कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी काल गुरुवारी सायंकाळी कुडाळ शहरासह तालुक्यातील विविध नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देऊन प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गामातांचे दर्शन घेतले.
यावेळी ग्रामस्थ मंडळानी आमदार वैभव नाईक यांचा सत्कार केला.
यावेळी शिवसेना कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट , उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर , नगरसेविका श्रुती वर्दम, राजू गवंडे, संजय भोगटे ,नितीन सावंत ,राकेश वर्दम ,गुरु गडकर चेतन पडते आदिंसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)