ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
प्रदर्शनातील फोटोंपेक्षाही मोदींचे कार्य मोठे आहे : केंद्रीयमंत्री नारायण राणे.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

प्रदर्शनातील फोटोंपेक्षाही मोदींचे कार्य मोठे आहे : केंद्रीयमंत्री नारायण राणे.

प्रकाशन: 30 Sep 2022 02:50 PM
वाचन संख्या 57

कणकवलीत ‘नरेंद्र मोदी जीवनपट’ चित्र प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन…..!

Article image

कणकवली | प्रतिनिधी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण जीवनपट कणकवलीत चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या चित्रा प्रदर्शनाचे उद्घाटन आज केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्र प्रदर्शन हा उपक्रम स्तुत्य आहे. परंतु या प्रदर्शनातील फोटो पेक्षा कित्येक पटीने नरेंद्र मोदी यांचे कार्य मोठे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी काढले. तसेच या प्रदर्शनातील सर्व फोटोंचे एक पुस्तक बनवून ते जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहनही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले.

Article image


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरावडा आयोजित करण्यात आला असताना या सेवा पंधरावडयाच्या निमित्ताने कणकवलीत भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली पेट्रोल पंप समोर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजन तेली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि प अध्यक्ष संजना सावंत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर जे पवार, नगरसेवक अभिजित मुसळे, मेघा, गांगण, आण्णा कोदे, विराज भोसले, शिशिर परुळेकर, सरपंच संतोष राणें, बबलू सावंत, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे, संदीप मेस्त्री, महेश सावंत, नितीन पाडावे, सरपंच मंगेश तळगावकर, प्रशांत राणें, पंढरी वायगणकर, सुरेश सावंत, परशुराम झगडे, माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच सचिन पारधीये, नगरसेविका मेघा सावंत, सायली सावंत, शिवप्रसाद देसाई, सदा चव्हाण, अभय राणें, नगरसेवक रवींद्र गायकवाड, बंडू गांगण, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, प्रकाश सावंत, सरपंच सुहास राणे, नितीन पाडावे, भाई आंबेलकर, समर्थ राणें, नामदेव जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स