कणकवली भा.ज.यु.मो. तर्फे आयोजीत रक्तदान शिबिरात १२३ कार्यकर्त्यांनी केले रक्तदान..!
कणकवली | प्रतिनिधी : भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवलीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाले. या शिबिरात १२३ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
या शिबीराला संदेश उर्फ गोटया सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, समीर नलावड़े, भाजपा मंडळ अध्यक्ष मिलींद मेस्त्री, संतोष कानडे, मनोज रावराणे, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री,
अन्ना कोदे,दिलीप तळेकर,राजन चिके,गणेश तळगावकर, ससंदिप सावंत,नितिन पाड़ावे,सोनू सावंत, आनंद घाड़ी, सुभाष मालंडकर संतोष पूजारे, समीर प्रभुगावकर, स्वप्निल चिंदरकर,सर्वेश दळवी,बबलू सावंत,पंढरी वायंगणकर, सागर राणें उपस्थित होते.
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला १२३ रक्तदात्यानी यावेळी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
सिंधुदुर्ग रक्तपेढ़ीचे डॉक्टर अमित आवळे,डॉ आरती महात्मे,प्रांजलि परब,भारती भोसले, सुरेश डोंगरे, दीपक भाटवाडेकर उपस्थित होते,शिबीर यशस्वी होण्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योगदान दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)