जामसंडे येथे २ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कै.नीलकंठ श्रीधर दिक्षित यांचे पुण्यस्मरणार्थ पुरस्कृत, कै.अथर्व अशोक दिक्षित चषक जामसंडे सन्मित्र मंडळ,जामसंडे यांच्यावतीने २ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा खुला व शालेय गटामध्ये होणार आहे.
खुला गट प्रथम क्रमांक ३०००/- चषक, व्दितीय क्रमांक २०००/- चषक, तृतीय क्रमांक १५००/- चषक, चतुर्थ क्रमांक १०००/- चषक, पंचम क्रमांक ७००/- चषक, उत्कृष्ट महिला प्रथम क्रमांक १०००/- चषक, व्दितीय क्रमांक ७००/-,तृतीय क्रमांक ५००/-, उत्कृष्ट देवगड तालुका खेळाडू प्रथम क्रमांक ७००/- चषक, व्दितीय क्रमांक ६००/-,तृतीय क्रमांक ५००/-, ९ वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक ७००/- चषक, व्दितीय क्रमांक ५००/-, १७ वर्षाखालील गटासाठी प्रथम क्रमांक १०००/- व चषक , व्दितीय क्रमांक ७००/-, १४ वर्षाखालील प्रथम क्रमांक १०००/- चषक,व्दितीय क्रमांक ७००/-, हि स्पर्धा साखळी सामन्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरु होईल स्थळ मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे उत्कृष्ट तालुका खेळाडू कणकवली,वेंगुर्ला,मालवण,कुडाळ,सावंतवाडी,वैभववाडी,दोडामार्ग प्रथम क्रमांक प्रत्येकी ७००/- चषक, अधिक माहितीसाठी राजा भुजबळ,सुयश पेठे,अभिषेक सांगळे,राजदिप सावंत यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)