ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'यतीन खोत मित्रमंडळ' पुरस्कृत आणि सौ.शिल्पा यतीन खोत आयोजीत नवरात्रोत्सव सोहळ्याचे शानदार उद्घाटन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'यतीन खोत मित्रमंडळ' पुरस्कृत आणि सौ.शिल्पा यतीन खोत आयोजीत नवरात्रोत्सव सोहळ्याचे शानदार उद्घाटन..!

प्रकाशन: 27 Sep 2022 01:47 AM
वाचन संख्या 582

शिवसेना तालुकाप्रमुख व माजी जि.प.सदस्य हरी खोबरेकर व सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित..

नऊ दिवस चालणार महिला आणि बच्चे कंपनीसाठीही विविध उपक्रम कार्यक्रमांची पर्वणी..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती ‘यतीन खोत मित्रमंडळ’ पुरस्कृत व शिवप्रेमी समाजसेविका सौ. शिल्पा यतीन खोत आयोजीत दिमाख़दार नवरात्रोत्सवाचे काल रात्री शानदार उद्घाटन झाले.

माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत व सौ.शिल्पा यतीन खोत यांच्या निवासस्थाना जवळील मैदानावर दरवर्षी अतिशय जोशात साजरा होणारा हा नवरात्रोत्सव , कोरोना कालावधीतील कडक निर्बंधां नंतर आता पुन्हा कितीतरी पट जोमाने साजरा केला जात आहे.

या नरात्रोत्सवाच्या उद्घाटन समईपूजन व दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख व माजी जि.प.अध्यक्ष हरी खोबरेकर, माजी पंचायत समिती सभापती सौ.पूनम परशुराम खोत, माजी नगरसेविका सौ.महानंदा खानोलकर , भाई कासवकर , बाबू गांगनाईक, बाळा परब, दिलीप पवार, बाबा चव्हाण, ज्येष्ठ उद्योजक व माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत यांचे वडिल श्री परशुराम खोत, विनोद परब , संजय टेमकर, बाबू परब,उमेश परब, सौ.आचरेकर, सौ. प्राची गांगनाईक, सौ.हळदणकर, सौ.दीक्षा जाधव , कु. तनिष्का खोत तसेच यतीन खोत मित्रमंडळातील सदस्य, लहान मुले मुली व शहरवासीय उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाचे जसजसे दिवस पुढे जातात तसतसा या सोहळ्याला नवनवीन उपक्रम कार्यक्रमांचा रंग चढत जाणार असून महिलांसाठी विशेष गरबा व फॅन्सी ड्रेस तसेच सातव्या रात्री बच्चे कंपनी साठी फॅन्सी ड्रेस स्पर्धाही आयोजीत करण्यात आली आहे.

माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत यांनी यावेळी शहरवासीयांनी जास्तीतजास्त संख्येने या सांस्कृतिक आनंदाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

आयोजक सौ.शिल्पा यतीन खोत यांनी सर्व मालवण वासिय व खासकरुन महिला व मुलांसाठी सांस्कृतिक व्यक्तता मंच देणे हे आपले कर्तव्य असून या सोहळ्यात जास्तीतजास्त जणांना संधी मिळवून देताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत व सौ. शिल्पा यतीन खोत यांनी सर्वांना देवीचा आशीर्वाद लाभून भरभराट होवो अशी देवीचरणी प्रार्थना केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स