ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर पडेकाप माळरानवर बैलाला बसला गावठी बाॅम्बचा फटका..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर पडेकाप माळरानवर बैलाला बसला गावठी बाॅम्बचा फटका..!

प्रकाशन: 26 Sep 2022 10:17 PM
वाचन संख्या 279

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर पडेकाप माळरानावर गावठी बाॅम्बचा फटका एका मुक्या बैलाला बसल्याची घटना घडली आहे.
चरण्यासाठी गेलेल्या बैलाने, अवैध शिकारीसाठी ठेवण्यात आलेला गावठी बॉम्ब चावल्याने बैलाचा जबडा फुटून बैलाला जबर इजा झाली.
आज दुपारच्या दरम्यान ही गोष्ट घडली यात बैल गंभीर जखमी झाला असून जबडा फुटला आहे.

याबाबत चिंदर अपराजवाडी येथील बैलाचे मालक मनोज दत्ताराम सावंत यांनी माहिती दिली. घटनेची माहित मिळाल्यानंतर आचरा पोलीस ठाण्याचे संदीप कांबळे अभिजित बाबल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली

चिंदर अपराजवाडी येथील शेतकरी मनोज दत्ताराम सावंत यांनी आपली गुरे चिंदर पडेकाप माळरानावर सकाळी चारण्यास सोडली होती. दुपारी गुरे आणण्यासाठी गेल्यावर त्याना बैल जबडा फुटलेल्या अवस्थेत रक्तबंबाळ झालेला दिसून आला बैल खाली पडून वेदनेने विव्हळत होता. मोठया प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना लागलीच बोलवत उपचार चालू केलेत.
शेतीच्या कामाचा बैल जखमी झाल्याने मनोज सावंत हे व्यथित झाले आहेत नुकसान भरपाईची अपेक्षा करत आहेत. जखमी बैलावर डॉ. कांबळे, डॉ.परुळेकर यांनी उपचार चालू केले होते.
मनोज सावंत यांच्या कामाच्या बैलाला इजा झाल्याने त्याची योग्य ती भरपाई शासनदरबारी मिळावी अशी मागणी व अपेक्षा मनोज सावंत यांनी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स