ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
जिल्ह्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्राना संगणकासह प्रिंटरची मागणी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्ह्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्राना संगणकासह प्रिंटरची मागणी.

प्रकाशन: 26 Sep 2022 01:18 PM
वाचन संख्या 44

आमदार नितेश राणेंनी दिले जिल्हा नियोजन समितीला पत्र.

कणकवली | प्रतिनिधी : ‘स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत २०२१ – २२ लेखाशीर्ष कोव्हिड १९ विषाणू प्रतिबंध’ अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग करीता कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघातील आरोग्य केंद्राना कॉन्स्स्ट्रेटर्स पुरविण्यासाठी सुमारे ११ लाख ५१ हजार रुपये एवढ्या कामाच्या निधीस मंजुरी देण्यात आली होती.
जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णाची संख्या अत्यंत कमी झाल्याने कॉन्स्स्ट्रेटरची आवश्यकता नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांच्या ८ जून, २०२२ च्या पत्रानुसार कळविल्यामुळे या कामात बदल करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यातील प्रमुख एकूण ८ प्रा. आ. केंद्रांना संगणकासह प्रिंटर पुरविण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीकडे आमदार नितेश राणे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या कणकवली व देवगड तालुक्यातील प्रत्येकी ३ तर वैभववाडी तालुक्यतील २ प्राथमिक आरोग्य केंद्रसह एकूण ८ प्रा. आ. केंद्रांना याचा लाभ मिळणार आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण, फोंडा, वरवडे व देवगड तालुक्यातील पडेल, शिरगांव, फणसगाव तर वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे, वैभववाडी अशा एकूण ८ प्राथमिक आरोग्य केंद्राना संगणकासह प्रिंटर साहित्य लवकरच उपलब्ध होणार आहे. यावर निधी खर्च करणेबाबतचे लेखी पत्र जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा सचिव जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग यांना आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स