कलमठ येथे रस्त्याला गटार व्यवस्था करावी..!
कणकवली | ब्यूरो न्यूज :
आचरा मार्गावर कलमठ सुतारवाडी- कोरगावकर दुकान याठिकाणी रस्त्याला गटार नसल्याने पावसाळ्यात सर्व पाणी रस्त्यावर येते.
वाहने जात असताना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पाणी उडते. तसेच सातत्याने पाणी साचून राहत असल्याने दुचाकी गाड्या
अनेकदा घसरून अपघात होत आहेत. याबाबत गांभिर्याने विचार करून कोरगावकर दुकान ते आचरा तिठ्यापर्यंत कायमस्वरूपी कॉक्रिट गटार करून रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)