ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना.

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना.

प्रकाशन: 26 Sep 2022 01:25 PM
वाचन संख्या 72

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती..!

आजपासून गुरुवार ६ ऑक्टोबर पर्यंत देवीची नित्यपूजा,आरती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांनी होणार नवरात्रोत्सव साजरा..!

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे, प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.


कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.आकर्षक मंडप व देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यावेळी देवीची सवाद्य मिरवणूक कणकवली ढालकाठी येथून झेंडाचौक, पटवर्धन चौक, ते महामार्गावरुन शिवसेना नवरात्रोत्सव स्थळापर्यंत जल्लोषात काढण्यात आली.यावेळी दुर्गामातेचा जयजयकार करत, फटाक्यांची आतषबाजी,ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकित आ.वैभव नाईक, संदेश पारकर कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. देवीच्या आगमनाचा उत्साह साजरा करण्यात आला.
आजपासून गुरुवार ६ ऑक्टोबर पर्यंत देवीची नित्यपूजा,आरती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.याप्रसंगी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,युवानेते संदेश पारकर, नवरात्रोत्सव कमिटी अध्यक्ष रामदास विखाळे,खजिनदार प्रदिप मसुरकर,उपजिल्हाप्रमुख राजू शेटये,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत,नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर,रुपेश नार्वेकर,सचिन सावंत,सुजित जाधव शहरप्रमुख उमेश वाळके,उपतालुका प्रमुख राजू राणे, जेष्ठ शिवसैनिक अनिल हळदिवे, हर्षद गावडे, जयसिंग नाईक, सतीश नाईक, रूपेश आमडोस्कर,ललित घाडीगावकर,सिद्धेश राणे,महेश कोदे,प्रसाद अंधारी, सोहम वाळके,योगेश मुंज, अजित काणेकर, तेजस राणे, विलास गुडेकर,भालचंद्र दळवी,बंडू ठाकूर, पराग म्हापसेकर, प्रशांत वनस्कर,नितीन राऊळ,अरुण परब,रोहित राणे,सचिन आचरेकर,जोगी राणे, बाळू मेस्त्री, निकेतन भिसे, ओंकार चव्हाण, किरण वर्दम,अमित मयेकर,उत्तम लोके,
सौ. स्नेहा वैभव नाईक, प्रतीक्षा साटम, वैद्येही गुडेकर,स्वरूपा विखाळे,शोभा बागवे, धनश्री मेस्त्री,रश्मी बाणे, मीनल म्हसकर,अश्विनी मोरये, दिव्या साळगावकर,नंदा साटम,अनिशा सावंत,सायली विखाळे,ईरा गावडे आदी शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स