ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
लायन्स क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने श्रीकृष्ण बागवे सन्मानित…!

लायन्स क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने श्रीकृष्ण बागवे सन्मानित…!

प्रकाशन: 26 Sep 2022 10:48 AM
वाचन संख्या 115

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
लायन्स क्लब मालवण यांच्यावतीने सर्जेकोट मिर्याबांदा शाळेचे मुख्याध्यापक व मसुरे गावचे सुपुत्र श्रीकृष्ण बागवे याना आदर्श शिक्षक पुरस्कार मालवण येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डाँ. शशिकांत झाटये व मान. सागर तेली सी. ए. लायन्स झोन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कार मिळाल्याने जबाबदारीमध्ये आणखी वाढ झाली असल्याचे मनोगत व्यक्त करताना पुरस्कारासाठी निवड केल्या बद्दल श्रीकृष्ण बागवे यांनी लायन्स क्लबचे आभार मानले. मान्यवरांनी यावेळी श्रीकृष्ण बागवे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी अध्यक्ष वैशाली शंकरदास,सचिव अनुष्का चव्हाण, खजिनदार अंजली आचरेकर,
लायन्स मेंबर्स, श्री. जयश्री हडकर,उमेश नेरूरकर, विश्वास गांवकर ,गणेश प्रभुलकर, नाना साईल, दत्ताराम रेवंडकर, जि प आदर्श शिक्षक श्री गुरुनाथ ताम्हणकर, सौ तेजल गुरुनाथ ताम्हणकर, राज्य आदर्श शिक्षक शिवराज सावंत, मुख्याध्यापिका सौ. शर्वरी शिवराज सावंत, श्रीअंकुश कणेरकर, कनेरकर मॅडम, अमर वाघमारे, सौ वाघमारे मॅडम, मसुरे माजी उपसरपंच श्री. अशोक बागवे, सौ श्रद्धा बागवे, प्रताप बागवे, मनिषा दाते, कासले तसेच लायन्स क्लब सदस्य उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स