कणकवलीत चोरट्यांनी फोडले चक्क 'दहा फ्लॅट्स्..!!
चोरट्यांनी केला नागरिकांवर हल्ला..!!
चोरट्यांचे वाढते धाडस, नागरिकांच्या चिंतेचा विषय..!!
कणकवली | ब्यूरो न्यूज : शहरातील मराठा मंडळ रोडवर असलेल्या क्रिस्टल रेसिडेन्सी बिल्डींग मधील तब्बल दहा फ्लॅट फोडण्याची घटना आज उघड झाली. दरम्यान फ्लॅट फोडत असतानाचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या लगतच्या काही नागरिकांवर चोरट्याने विटा भिरकावल्या आणि कटावणीने हल्ल्याचाही प्रकार केला. बंद फ्लॅट फोडत असताना इतर लोक राहत असलेल्या फ्लॅट ना बाहेरून कडी घालून घेत चोरट्यानी सावधगिरी बाळगली. जे दहा फ्लॅट फोडले त्यामध्ये दरवाज्याचा कडीकोयडा तोडून चोरट्यानी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. मात्र ही बाब काहींच्या लक्षात येतात फ्लॅट मधील काही लोकांनी आरडाओरड केली. यादरम्यान त्यांनी आणि येथे राहत असलेल्या या बिल्डिंग मधील एका फ्लॅट धारकाने या बिल्डिंग खाली येत या चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच दरम्यान चोरट्यानी तिथे असलेल्या विटा या नागरिकांवर भिरकावत हल्ला केला. तसेच चोरटे पळून जात असताना त्यांना अडवण्याचा प्रयत्न तेथील नागरिकांनी केला असता चोरट्यांच्या हातात असलेली कटावणी घेऊन हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान ज्या ठिकाणी फ्लॅट फोडले गेले त्या ठिकाणी अनेक उर्वरित फ्लॅट ना बाहेरून कडी लावली होती. जे फ्लॅट फोडले त्यामध्ये रहिवासी आत नसल्याने बंद फ्लॅट हेरून चोरट्याने हा डल्ला मारला. मात्र ज्यावेळी चोरट्यांना प्रतिकार करण्यास काही पुढे सरसावले तेव्हा त्यांनी हल्ला करण्यासाठी केलेला प्रयत्न हा ही बाब गंभीर असून, याबाबत तात्काळ उपाय योजना होण्याची गरज आहे. तसेच हे चोरटे पळून जात असताना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाले आहेत. ही चोरी करत असताना तीन चोरटे होते अशी माहिती स्थानिकांनी दिली. घटनेची माहिती मिळतात नगरसेवक व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांशी चर्चा केली. तसेच याबाबत पोलिसांना देखील माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून याबाबतची अधिक माहिती पोलीस घेत आहेत पोलिसांकडून संबंधित फ्लॅट मालकांना संपर्क सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)