ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक उत्पादनाची खरेदी करून " व्होकल फाॅर लोकल " चा दिला नारा ….!

महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक उत्पादनाची खरेदी करून " व्होकल फाॅर लोकल " चा दिला नारा ….!

प्रकाशन: 24 Sep 2022 11:11 AM
वाचन संख्या 74

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
कोरोना महामारीने भारताचीच नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. कोरोनामुळे सरकारने लोकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन लागू केले होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनच्या 3 टप्प्यांनंतर सरकारने काही प्रमाणात दिलासा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर व्यवसाय, उद्योग पुन्हा रुळावर आणण्याची सर्वात मोठी अडचण होती. लॉकडाऊनमध्ये जिथे लोकांची बचत संपली, तिथे पगार न देणे, उत्पादन न होणे, माल न विकणे यामुळे व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवसाय आणि वाणिज्य व्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी मदत पॅकेज (रु. http://localhost/news/public/uploads/20 लाख कोटी) जाहीर केले. यासोबतच त्यांनी लोकांना विनंती केली की, भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी स्थानिक वस्तू जास्त खरेदी करा जेणेकरून छोट्या उद्योजकांना फायदा होईल आणि देशाचा पैसा देशातच राहील. तसेच लोकांना “वोकल फॉर लोकल” बनण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांच्या या आवाहनाला साथ देत महिला मोर्चाच्या पदाधिकारयांनी वेंगुर्ले तालुक्यातील वजराठ गावातील सावंत – भोसले यांच्या पाॅवरलुम ला भेट देत, त्यांनी बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या.
यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे, जिल्हा उपाध्यक्ष अँड सुषमा खानोलकर, कुडाळ महिला अध्यक्षा मुक्ती परब, वेंगुर्ले महिला ता.सरचिटणीस वृंदा गवडंळकर, वेंगुर्ले महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, माजी नगरसेवीका प्रज्ञा राणे, रेखा काणेकर, आदिती सावंत, आकांक्षा परब, रसीका मठकर , वृंदा मोर्डेकर, हसीनाबेन मकानदार, शुभांगी सावंत – भोसले व बाबु भोसले उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स