ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरे विठ्ठल मंदिर हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता…!

मसुरे विठ्ठल मंदिर हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता…!

प्रकाशन: 24 Sep 2022 11:44 AM
वाचन संख्या 59

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे मर्डेवाडी श्री विठ्ठल मंदिर येथील हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. गेले आठ दिवस मंदिर परिसर हरिनामात रंगून गेला होता. ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला’ असा जयघोष आणि मंदिर परिसरात केलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई यामुळे मंदिर परिसर झळाळून गेला होता. हरिनाम सप्ताहात पंचक्रोशीतील भजनी मेळ्या सह त्रिंबक, चिंदर, मालोड, बेलाचिवाडी, बांदिवडे, आडवली, खुडी येथील भजनी मेळ्यानी आपली सेवा दिली. मसुरे टोकळवाडी मंडळाच्या गोफ नृत्याने रंगत आणली. हरिनाम सप्ताहात अखेरच्या दोन दिवसात सादर करण्यात आलेल्या दिंड्या मुख्य आकर्षण ठरल्या. मसुरे टोकळवाडी मंडळाचा संत तुकाराम वैकुंठ गमन, मसुरे मर्डेवाडी मंडळाचा बलराम गर्वहरण, आणि मसुरे गडघेरावाडी मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम भेट देखावे साकारण्यात आले.
हरिनाम सप्ताहात सादर केलेल्या देखाव्या सोबत फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स