कणकवलीत शिवसैनिकांचा फटाके लावुन जल्लोष..!
कणकवली | ब्युरो न्यूज : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदान तथा शिवतीर्थावर घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांमधून जल्लोष साजरा केला जात आहे.
या निर्णयाचे स्वागत कणकवलीत देखील केले जात असून, कणकवलीत श्रीधर चौक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जोरदार घोषणाबाजी दिली व आनंद साजरा केला. यावेळी उद्धव ठाकरे आगे बढो ज्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नवरात्रोत्सव समिती अध्यक्ष रामदास वीखाळे, नगरसेवक कन्हेया पारकर, ॲड. हर्षद गावडे, महेश कोदे, रुपेश आमडोसकर, प्रसाद अंधारी, प्रदीप परब, सचिन आचरेकर, विलास गुडेकर, किरण वर्दम, सोहम वाळके, प्रशांत वनस्कर, निकेतन भिसे, बाबु केनी, सचिन राणे, महेश कोदे वगैरे शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)