देवबाग होडी दुर्घटनेतील बेपत्ता श्री. विष्णू राऊळ यांच्या कुटुंबियांची आ.वैभव नाईक यांनी भेट घेऊन दिला धीर.
मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग समुद्र किनारी झालेल्या नौकेच्या दुर्घटनेत देवबाग गावचे श्री. विष्णू बळीराम राऊळ (वय ५५) हे श्रमीक मच्छीमार बेपत्ता झाले आहेत.
काल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी श्री.राऊळ यांच्या घरी भेट देत विचारपुस करत कुटुंबियांना धीर दिला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मालवण शहरप्रमुख बाबी जोगी,सन्मेष परब, किरण वाळके, मोरेश्वर धुरी, अनिल केळुस्कर आदी उपस्थित होते.
मच्छीमारी करून किनाऱ्यावर परतत असताना समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात ‘मोरेश्वर कृपा’ होडी उलटली. सोमवारी सकाळी मालवण-देवबाग समुद्र किनारी ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ (वय ५५) हे मच्छीमार बेपत्ता झाले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)