ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
टी ट्वेंटी मालिकेतील दुसर्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमांचक विजय.!

टी ट्वेंटी मालिकेतील दुसर्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमांचक विजय.!

प्रकाशन: 23 Sep 2022 11:15 PM
वाचन संख्या 173

मालिकेतील चुरस कायम.

सुयोग पंडित | क्रिडा : नागपूर येथे खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या टी ट्वेंटी मालिकेतील दुसर्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली आहे.
पावसामुळे केवळ प्रत्येकी ८ षटकांच्या खेळविल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले.

कर्णधार रोहीत शर्मा.


पहिली पाच षटके भारतीय गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी कर्णधार रोहीत शर्माचा हा निर्णय सार्थ ठरवला. मागील सामन्यातील नायक कॅमेरून ग्रीन लवकर धावबाद झाला. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने त्यानंतर मॅक्सवेल आणि टीम डेवीडला त्रिफळाचित करत ऑसी फलंदाजीच्या फळीला खिंडार पाडले. एका बाजुने कर्णधार ॲराॅन फिंचने काही षटके फटकेबाजी केली परंतु पुनरागमन करणार्या जसप्रीत बुमराहने त्याला एका अप्रतिम याॅर्करवर त्रिफळाचित केले.
हाणामारीच्या षटकात मॅत्थ्यू वेडने फटकेबाजी करत ४३ धावा जमविल्या.
विजयासाठी निर्धारित ८ षटकांत ९१ धावांचा पाठलाग करणार्या भारताने तडाखेबंद सलामी देत केवळ तीनच षटकांत३९ धावा केल्या. नंतर मात्र के.एल.राहुल, विराट कोहली, यादव व हार्दिक पांड्या यांना झटपट बाद करत ऑसीज गोलंदाजांनी भारतावर दडपण आणले.
परंतु कर्णधार रोहीत शर्माने एक बाजू पाच षटकार व तीन चौकार मारुन नाबाद ठेवली होती.
शेवटच्या षटकांत ९ धावा हव्या असताना दिनेश कार्तिकने पहिल्या दोन चेंडूवर एक षटकार व एक चौकार फटकावत केवळ २ चेंडूत नाबाद १० धावा ठोकत भारताला ४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
कर्णधार रोहीत शर्माने केवळ २० चेंडूत नाबाद ४६ धावा ठोकल्या.
आता या मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना २५ सप्टेंबरला हैद्राबाद येथे होणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स