ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संजय पडते यांची जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संजय पडते यांची जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न.

प्रकाशन: 23 Sep 2022 07:33 PM
वाचन संख्या 57

जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे व सरपंच, लोकप्रतिनिधींच्या समस्यांकडे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष .

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत , शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेत विविध योजनांच्या कार्यवाही बाबत चर्चा केली. यामध्ये जलजीवन मिशन, २५/१५ ग्रामविकास निधी, आमदार स्थानिक विकास निधी, जिल्हा वार्षिक योजनेच्या विविध प्रलंबित कामांचा आढावा घेतला. या दरम्यान राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या विकास कामांबाबतसुद्धा विचारणा करण्यात आली. शाळांमध्ये शिक्षकांच्या नेमणुकीबाबत चर्चा करण्यात आली.
ज्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे त्या शाळेत शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच लोकप्रतिनिधी यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्या सोडविण्याची सूचना आ. वैभव नाईक यांनी केली.त्याबाबत योग्य ती कार्यवाही करून समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याचे प्रजीत नायर यांनी सांगितले.

यावेळी माजी जि.प. सदस्य राजू कविटकर, अतुल बंगे, आकेरी सरपंच महेश जामदार, हुमरस सरपंच अनुप नाईक, हेदूळ सरपंच नंदू गावडे, भडगाव उपसरपंच बाबी गुरव, वडाचापाट ग्रा. प. सदस्य अनंत पाटकर, पांडुरंग गावडे, बाबू टेंबुलकर, जी. प. बांधकाम कार्यकारी अभियंता श्री. आवटे, व जिल्हा परिषदच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स