ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
त्या मृतदेहाची ओळख पटली..!

त्या मृतदेहाची ओळख पटली..!

प्रकाशन: 23 Sep 2022 06:23 PM
वाचन संख्या 226

कणकवली | ब्युरो न्यूज :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण चिंचवली रोड नजीक शुकनदीच्या पात्राच्या शेजारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. यामुळे एकच खारेपाटण परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खारेपाटण येथे आज सकाळी १० च्या सुमराला खारेपाटण – चिंचवली रोड नजीक असलेल्या हसोळटेम्ब नजीक शुक नदीच्या पात्राशेजारी शेरणीच्या झाडात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदित मासेमारी करणाऱ्या व्यक्तींना आढळून आला. याबाबतची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी दिली. तसेच तातडीने पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांना घटनेची माहिती दिल्यानंतर खारेपाटण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पराग मोहिते, यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. मात्र सदर मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटलेली नाही. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी देखील तात्काळ खारेपाटण ला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

पुढील तपास सुरू करण्यात आल्यानंतर सापडलेल्या अनोळखी पुरुष इसमाच्या मृतदेहाची ओळख पटली असून सदर व्यक्ती ही केरळ येथील असल्याचे स्पॉट पंचनामा केल्यानंतर मिळालेल्या प्राथमिक पुराव्याच्या आधारे स्पष्ट झाले आहे.

खारेपाटण शुक नदी येथे आढळुन आलेले पुरुष जातीच्या इसमाचे बेवारस प्रेत हे केरळ येथील रहिवासी असलेले जि सी सुरेंद्रन वय वर्षे ४३ यांचे असून मयत व्यक्तीच्या खिशात आढळलेल्या कागदपत्रामुळे सदर व्यक्तीची ओळख पटली. त्यांच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क केला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उद्धव साबळे, पराग मोहिते करीत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स