तारकर्ली येथे दत्त प्रतिष्ठान आयोजित आरोग्य शिबिराचे आयोजन …!
विवेकानंद नेत्रालय कणकवली, एल एच एल व अगोस्तीन डिसोझा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्लीच्या गजानन रिसाॅर्ट येथे शनिवार दिनांक २४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता ‘दत्त प्रतिष्ठान आयोजित’ नेत्र तपासणी शिबिर व गरजुंसाठी मोफत चष्मा वाटप उपक्रम संपन्न होणार आहे.
तसेच महिलांसाठी खास हिमोग्लोबिन तपासणी व थायरॉईड तपासणीची सुविधा उपलब्ध असणार आहे.
विवेकानंद नेत्रालय कणकवली, एल एच एल व अगोस्तीन डिसोझा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजीक प्रतिसाद मिळावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)