ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
देवगडात सुजल ॲग्रो मार्टच्या वतीने ३० सप्टेंबरला आंबा बागायतदारांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.

देवगडात सुजल ॲग्रो मार्टच्या वतीने ३० सप्टेंबरला आंबा बागायतदारांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.

प्रकाशन: 19 Sep 2022 02:19 PM
वाचन संख्या 58

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या सुजल ॲग्रो केअर मार्ट यांच्यावतीने तालुक्यातील आंबा बागायतदारांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

सुजल ॲग्रो केअर मार्ट, देवगड यांच्यावतीने आंबा बागायतदारांना अचूक तसेच परिमाण कारक हवामान अंदाज कळण्याकरिता राज्यातील प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री. पंजाबराव डख़ यांचा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता इंद्रप्रस्थ सभागृह देवगड, हॉटेल डायमंड च्या मागे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सुजल ॲग्रो च्या माध्यमातून ते प्रथमच देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. तरी या संधीचा फायदा घेण्यासाठी देवगड एसटी स्टँड येथील सुजल ॲग्रो केअर मार्ट येथे प्रवेशिका उपलब्ध करण्यात आली आहे. पहिल्या १०० बागायतदारांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.तरी दिनांक २७ सप्टेंबर २०२२ पूर्वी सर्वांनी सुजल ॲग्रो यांना संपर्क करावा. असे आव्हान करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स