ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगेत आज 'तिरंगी २०-२०' भजनबारीचा जंगी सामना.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगेत आज 'तिरंगी २०-२०' भजनबारीचा जंगी सामना.

प्रकाशन: 18 Sep 2022 01:35 PM
वाचन संख्या 74

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुणगे श्री भगवती देवालय येथील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त १८ सप्टेंबर रोजी  २०×२० तिरंगी भजनांचा जंगी सामना होणार  आहे. 
देवी भगवती मंदिरामध्ये एकवीस दिवसाचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु असून त्यानिमित्ताने मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. सत्यनारायणाची महापुजा होणार असून त्यानिमित्ताने  रात्री १० वाजता २०×२० तिरंगी भजनाचा जंगी सामना गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ओरोसखुर्द,कोकणरत्न  चंद्रकांत कदम यांचे शिष्य बुवा ज्ञानदेव मेस्त्री (पखवाज बंटी मेस्त्री व तबला भावेश मेस्त्री),  विरुध्द  दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ मुंबई- बांद्रा बुवा प्रमोद हर्यान यांचे शिष्य बुवा गणेश जांभळे (पखवाज प्रणय धुरी व तबला सुदर्प घागरे) विरुद्ध  विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आजिवली बुवा अजित मुळम यांचे शिष्य बुवा प्रवीण सुतार (पखवाज रितेश पांचाळ ,तबला प्रविण  सुतार) यांच्यात तिरंगी भजनाचा जंगी सामना होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी दुपारी तीन नंतर श्री चे विसर्जन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा  लाभ घ्यावा असे आवाहन देवी भगवती देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये,  उपाध्यक्ष दिलीप महाजन आणि   सचिव निषाद परूळेकर यानी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स