ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रिक्षा चालक-मालक संघटनेच्या गणेशोत्सवात श्री.व सौ. सुशांत नाईक यांना गणपतीच्या आरतीचा मान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रिक्षा चालक-मालक संघटनेच्या गणेशोत्सवात श्री.व सौ. सुशांत नाईक यांना गणपतीच्या आरतीचा मान.

प्रकाशन: 18 Sep 2022 01:50 PM
वाचन संख्या 45

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून काल शुक्रवारी सायंकाळी कणकवलीचे नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने विशेष निमंत्रित करत श्री.व सौ. सुशांत नाईक यांना श्री. गणेशाच्या आरतीचा मान देण्यात आला.

कै. श्रीधरराव नाईक व कै. राजेंद्र राणे यांनी १९८५ साली कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेची स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून गेली ३७ वर्षे अखंडितपणे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेली ३७ वर्षे ही परंपरा सुरू ठेवली आहे. २१ दिवस श्री. गणेशाची मनोभावे सेवा चाकरी केली जाते. काल शुक्रवारी श्री. गणेशाच्या आरतीचा मान श्री व सौ सुशांत नाईक यांना देण्यात आला.

यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनेचे बाळा वराडकर, प्रभाकर कोरगावकर, भाई परब, संतोष सावंत, महेश आमडोसकर, श्री.मगम, मनोज वारे, संदीप घाडी, संतोष सावंत, रुपेश मगम, राजू चिंदरकर, संतोष राणे, बाळू वालावलकर व इतर सदस्य उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स