ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
भाजपा कुडाळ तालुक्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आनंदाश्रय येथे विविध उपक्रमांनी साजरा….!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा कुडाळ तालुक्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आनंदाश्रय येथे विविध उपक्रमांनी साजरा….!

प्रकाशन: 17 Sep 2022 05:00 PM
वाचन संख्या 41

कुडाळ व ओरोस मंडलाच्यावतीने ” सेवा पंधरवड्याचा ” शुभारंभ.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना साठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम आधी विविध कार्यक्रम या सेवा पंधरवाडा निमित्त राबविण्यात येत आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त “सेवा पंधरवडा” कुडाळ व ओरोस मंडलाच्या वतीने शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी निराधार वृद्धांना अन्न धान्य वाटप तसेच वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांच्या समवेत केक कापण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल तसेच तालुका सरचिटणीस विजय कांबळी, देवेंद्र सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सर्व निराधार वृद्धांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी आनंदाश्रय आणावचे बबन परब,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, एनटी आघाडी अध्यक्ष दीपक खरात, नगरसेवक निलेश परब, माजी सभापती नुतून आईर, ओरोस मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सौ सुप्रिया वालावलकर, स्नेहा सावंत, तुळसुली सरपंच नागेश आईर, युवा मोर्चाचे सोशल मीडिया अध्यक्ष राजवीर पाटील, सरचिटणीस अमित तावडे, सरचिटणीस अवधूत सामंत, निखिल कांदळगावकर, प्रितेश गुरव, महिला मोर्चाच्या पिंगुळी अध्यक्ष सौ साधना माडये, कुडाळ महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ मुक्ती परब, अणावं शक्ती केंद्र प्रमुख प्रशांत परब, योगेश घाडी, जयेश चिंचलकर सह अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स