पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्याच्या "सेवा पंधरावड्याची " माळगाव ग्रामपंचायत येथून विविध कार्यक्रमांनी सुरुवात.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
ग्रामपंचायत माळगाव येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी ठीक १०.००वाजता गावातील ग्रामस्थांना कृषी विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सकाळी ९.००ते १ वाजेपर्यंत PM Kisan E-KYC व आरोग्य कार्ड (Health Card) कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व माळगाव ग्रामपंचायत सरपंच निलेश खोत यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी उपसरपंच संदीप जाधव, माळगाव गावचे भाजप कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य चेतन साळकर, निधी खोत, कविता कासले, शुभांगी फणसेकर, पडेलकर सर, सुभाष खोत, दीपक मालवणकर, सत्यवान भोगले, गौतम खोत उपस्थित होते.
ग्रामस्थ संदीप भोसले, प्रभाकर खोपकर, काका पातडे, गोविंद सुर्वे, जनार्दन सुर्वे, अनंत जाधव, बाबा साळकर, पपी जाधव, अण्णा हरकुळकर, दिगंबर पळसमकर, मेघश्याम परब, सुधीर परब, अनिल परब, गुरू परब, संदेश परब, सागर गावकर, संतोष परब, सुरेश परब, पिंटो परब, दीपक बागवे, हरी चव्हाण, अशोक कसले, आबा शेलार, गीता शेलार. आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे माळगाव गावातील महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)