ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मुंबई म.न.पा. रुग्णालयातील कंत्राटी समाजविकास अधिकार्यांनी मानले भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचे आभार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुंबई म.न.पा. रुग्णालयातील कंत्राटी समाजविकास अधिकार्यांनी मानले भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचे आभार.

प्रकाशन: 15 Sep 2022 02:02 PM
वाचन संख्या 68

विवेक परब : एडिटोरिअल असिस्टंट : महाराष्ट्र राज्यातील मुंबई महानगरपालिका रुग्णालयात कंत्राटी तत्वावर समाजविकास अधिकारी कार्यरत असून ते रुग्णसेवा संबंधित विविध उपक्रमांत मोलाची कामगिरी बजावत असतात. कोविड१९ काळात डॉक्टर, परिचारिका यांच्या इतकेच समाजविकास अधिकारी वर्गाने महानगरपालिका रुग्णालयात मोलाची कामगिरी बजावली. कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेला हा अधिकारी वर्ग पूर्णवेळ भरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य मिळावे याकरिता विविध लोकप्रतिनिधींना निवेदने देत होता. अखेरीस त्यांच्या शिष्टमंडळाने भाजपा वैद्यकीय आघाडीकडे दाद मागायचे ठरवले. आघाडीचे राज्य सह-संयोजक तथा कोकण विभाग प्रभारी डॉ अमेय देसाई यांची दोन आठवड्यापूर्वी भेट घेऊन त्यांना हा विषय सांगितला. विषयाची तीव्रता लक्षात घेता डॉ देसाई यांनी हा विषय तत्काळ उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेण्याचे आश्वासन दिले आणि तसे केले.
काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयाची नोंद घेत सन्माननीय उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री महोदयांनी कोविड१९
काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना सार्वजनिक आरोग्य खात्यामधील भरतीच्या वेळी त्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांची गुणांकन कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश दिले. याबद्दल आज त्या समाजविकास अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय आघाडीचे प्रतिनिधी म्हणून डॉ.अमेय देसाई यांचे नरिमन पॉईंट येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात येऊन आभार मानले. त्याच बरोबर येत्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेऊन त्यांचे आभार मानले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स