भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्गची ऑनलाइन नियोजन बैठक संपन्न.
‘सेवा पंधरवडा’ बाबत नियोजनावर चर्चा व मार्गदर्शन.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवड्याच्या नियोजनाची बैठक ‘सेवा पंधरावडा’ जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली.
या बैठकीमध्ये सेवा पंधरावडा जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई यांच्यासहित भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व अनुसूचित जाती व जमाती भाजपा, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. भाजप भटके विमुक्त आघाडी व भाजप अनुसूचित जाती व जमाती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही आघाड्याकडून नियोजन करण्यात आले आहे 17 तारखेपासून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरा दिवसांमध्ये विविध उपक्रम राबवून नरेंद्र मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा भाजपकडून देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमी वरती भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहेच त्याच बरोबर आघाडी इतर उपक्रमात देखील सक्रिय भाग घेऊन काम करेल व सेवा पंधरवडा यशस्वीरित्या पार पाडण्यास योगदान देईल असे प्रतिपादन भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी केले. प्रत्येक मंडल तालुका निहाय आपापल्या भागात मंडळ अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते विविध उपक्रम राबवतील त्यात प्रामुख्याने स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय भाग घेऊन काम करणार आहे.
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी व अनुसूचित जाती व जमाती सिंधुदुर्ग जिल्हा आघाडी सेवा पंधरवडा साजरा करण्यासाठी सज्ज असून ठरलेल्या नियोजनाप्रमाणे नियोजित वेळेत आपले उपक्रम राबवतील. या सभेला सेवा पंधरवडा सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई, भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रकांत जाधव महिला भाजपा भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष तथा जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. पूजा जाधव, भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण, जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप होळकर, जिल्हा मीडिया प्रमुख दर्शन गोसावी, मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी, देवगड तालुका अध्यक्ष संतोष साळस्कर, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र निकम, सावंतवाडी बांदा मंडळ अध्यक्ष विजय जंगले, आंबोली मंडळ उपाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा सदस्य रवी चव्हाण, मालवण तालुका उपाध्यक्ष सुनील वरक मालवण तालुका मीडिया प्रमुख कृष्णा कोकरे, मालवण कार्यकारणी सदस्य रोशन गोसावी, बसूराज सूर्यवंशी, किरण शिंदे, राजू शिंदे, दशरथ वरक व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)