ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
ह्युमन राईट्सचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांची कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयावर टीका..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ह्युमन राईट्सचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांची कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयावर टीका..!

प्रकाशन: 15 Sep 2022 02:24 PM
वाचन संख्या 80

संतोष साळसकर / ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
कणकवलीतील दुय्यम निबंधक कार्यालय हे शासकीय की खाजगी असा उपरोधिक सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट्सचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी उपस्थित केला आहे. कणकवलीत तहसीलदार यांचे मुख्य प्रशासकीय इमारतीत दुय्यम निबंधक यांचे कार्यालय आहे. निरनिराळ्या दस्तऐवजांच्या नोंदणीकरिता या कार्यालयात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. परंतु संबंधित कार्यालयात कार्यरत असलेल्या नेमक्या शासकीय व्यक्ती कोण? हेच नेमके तिथे कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना कळेनासे झाले आहे. याचे कारण असे की, संबंधीत कार्यालयात काही खाजगी व्यक्ती या आपण तेथीलच शासकीय व्यक्ती असल्याच्या अविर्भावात वावरून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करीत आहेत असा आरोप राजेश जाधव यांनी केला आहे.. या खाजगी व्यक्ती संबंधित कार्यालयातील टेबल – खुर्च्या, सील – शिक्के, नोंदणीकरिता आलेले नागरिकांचे दस्तऐवज इ. शासकीय सामग्री – मालमत्तेचा अनधिकृतपणे व बिनदिक्कतपणे वापर करीत आहेत. तसेच नागरिकांना त्यांच्या दस्तऐवजांच्या नोंदणीकरिता मदत करतो असे भासवून त्यांच्याकडून आर्थिक मोबदला उकळत असून असा आर्थिक मोबदला देण्याचे टाळल्यास संबंधित सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या फोनवरून संपर्क करणे व पुन्हा आर्थिक मोबदल्याची मागणी करणे असे प्रकार घडत आहेत. त्यातून नाहक असा आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे संबंधित कार्यालयात शासकीय व्यक्ती असल्याच्या अविर्भावात काही खाजगी व्यक्तींचा सुरू असलेला वावर व त्यांच्याकडून शासकीय सामग्री – मालमत्तेची होत असलेला हाताळणी वापर या सर्व बाबी अनधिकृतपणे व बिनदिक्कतपणे संबंधित दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात त्यांच्या नजरेसमोर सुरू असून देखील त्यांच्याकडून अशा प्रकारच्या सर्व प्रकारांवर निर्बंध का घातले जात नाहीत? हा खरेतर आश्चर्याचा व संशोधनाचाच प्रश्न आहे असे राजेश जाधव यांनी सांगितले.

याबाबत त्यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांचे जिल्हा व विभागीय पातळीवरील वरिष्ठ स्तरावर संपर्क साधून तेथील संबंधित अधिकारी वर्गाशी आवश्यक तो चर्चा-विनिमय केलेला आहे. तरी देखील दुय्यम निबंधक कणकवली यांचे कार्यालयातील खाजगी व्यक्तींच्या अनधिकृत वावरास संबंधितांकडून निर्बंध न करण्यात आल्यास व घडत असलेल्या गैरप्रकारांना आळा न बसल्यास त्याविरोधात पुराव्यासहित लेखी तक्रार नोंदविणार असल्याचा माहितीवजा इशारा राजेश जाधव यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स