ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खारेपाटणातील शेठ न.म. विद्यालय व जुनियर कॉलेजमध्ये १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान विज्ञान प्रदर्शन.

खारेपाटणातील शेठ न.म. विद्यालय व जुनियर कॉलेजमध्ये १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान विज्ञान प्रदर्शन.

प्रकाशन: 11 Sep 2022 08:55 PM
वाचन संख्या 50

संतोष साळसकर / ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक  मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, खारेपाटण या प्रशालेमध्ये कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ व १३ सप्टेंबर असे दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन जिल्हा शिक्षण विभाग, पंचायत समिती, कणकवली यांच्यावतीने आयोजित केले आहे.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये कणकवली तालुक्यातील ८५ प्राथमिक शाळा व ३५ माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या प्रत्येक शाळेतून एक विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कणकवली आमदार नितेश राणे, यांच्या हस्ते होणार आहे. तर यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार रमेश पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मोहन भोई, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत आणि संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश  कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, राजेंद्र वरूणकर तसेच संस्थेचे सर्व संचालक तसेच प्राचार्य संजय सानप व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कणकवली तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी शिक्षक वृंद तसेच तालुक्यातील सर्व नागरिक यांना केलेले आहे.
या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी स्पर्धकांची भोजन व्यवस्था शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेजच्यावतीने करण्यात आलेली आहे असे प्रशालेच्या वतीने स्पष्ट केले गेले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स