ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण (शहर मंडल ) भाजप भटके-विमुक्त आघाडी अध्यक्षपदी अशोक मोहीते…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण (शहर मंडल ) भाजप भटके-विमुक्त आघाडी अध्यक्षपदी अशोक मोहीते…!

प्रकाशन: 12 Sep 2022 10:37 AM
वाचन संख्या 241

जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी निवड केली जाहीर .

मालवण | सुयोग पंडित : माजी आमदार नरेंद्र पवार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (भटके-विमुक्त आघाडी) यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार निलेश राणे व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शना नुसार सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या मालवण शहर मंडल अध्यक्ष पदी मालवण तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे जेष्ठ समाजसेवक अशोक मोहिते यांची निवड करण्यात आली. अशोक मोहिते मालवण तालुका बेलदार भटका समाज संघटनेचे विद्यमान तालुका अध्यक्ष असून तालुक्यासहित सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांचे निवडीने भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीला निश्चितपणाने ताकद मिळेल असा विश्वास जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी व्यक्त केला.

मालवण येथील भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष श्री. शांताराम(बाळा)गोसावी यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या मालवण कार्यकारणी बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड जाहीर करण्यात आली. यावेळी बोलताना श्री अशोक मोहिते म्हणाले की भाजप पक्षाला यांना अभिप्रेत असणारे काम आघाडीच्या माध्यमातून करू व आघाडीतील सर्व समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करु. समाजातील जातीचे दाखले, रस्ते कामे यांसारखे कामे अजून प्रलंबित आहेत त्याचा आपल्या आघाडीकडून पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत सर्वांनी एकत्र मिळून काम करूया असे प्रतिपादन केले.

यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष श्री नवलराज काळे, जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, मालवण तालुका अध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी,जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी चव्हाण,तालुका उपाध्यक्ष सुनील वरक,राजू मानवर, अमित गोसावी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स