सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित राज्यस्तरीय बाल अभंग गायन स्पर्धेत अथर्व गिरकर प्रथम.
बांदा | राकेश परब :
सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित राज्यस्तरीय बाल अभंग गायन स्पर्धेत मुंबई मालाड येथील कु. अथर्व उदय गिरकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत व्दितीय क्रमांक कु. वृत्तीका कृष्णा परब- (भांडुप -मुंबई), तृतीय क्रमांक कु. जय समिर राऊळ (पिगुळी सिंधुदुर्ग) यांनी पटकाविला.
विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरीय बाल अभंग गायन स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक कु. चिन्मयी निलेश मेस्त्री ( इन्सुली- सावंतवाडी), कु. कौशल्य शशिकांत पवार ( उस्मानाबाद), कु. मंदार बापु नाईक (तुळस खरीवाडी वेंगुर्ला) तर विशेष उत्तेजनार्थ क्रमांक कु. ममता दत्तप्रसाद प्रभु (आजगांव- सावंतवाडी), कु. तेजल रविंद्र गावडे ( आसोली- वेंगुर्ला), कु. नितेश दत्ता राऊळ ( कोलगांव – सावंतवाडी), कु. धिरज अमित मेस्त्री (ओरोस – सिंधुदुर्ग) यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेचे परिक्षण संगित क्षेत्रातील संगितरत्न अरुण म्हात्रे बुवा यांनी केले.तर स्पर्धेचे नियोजन सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश परशुराम परब यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश नाईक, राजेश सावंत, प्रशांत परशुराम परब, संतोष ओटवणेकर, विलास राऊळ, विलास गवस, रितेश नाईक, देवेंद्र नाईक, अनिल गावडे, रजत गवस, पुंडलिक जाधव आदीनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)