ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणचे माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक यतीन खोत यांनी घेतले खासदार विनायक राऊत यांच्या गणपतीचे दर्शन.

मालवणचे माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक यतीन खोत यांनी घेतले खासदार विनायक राऊत यांच्या गणपतीचे दर्शन.

प्रकाशन: 10 Sep 2022 06:37 PM
वाचन संख्या 103

कालेली गांवच्या सरपंच सौ.सानिका सचिन परब आणि शिवप्रेमी समाजसेविका सौ.शिल्पा यतीन खोत यांचीही उपस्थिती.

चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत यांनी खासदार विनायक राऊत यांच्या तळगांव येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले.


यावेळी त्यांच्यासह कालेली गांवच्या सरपंच सौ सानिका सचिन परब आणि शिवप्रेमी समाजसेविका व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या मालवण तालुका अध्यक्ष व शिवप्रेमी समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत होत्या.
या वेळी खासदार विनायक राऊत यांनी विशेष वेळ देऊन माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत यांच्याशी विविध मुद्द्यांवर अनौपचारिक चर्चा केली.
या भेटी बद्दल बोलताना सौ.शिल्पा यतीन खोत यांनी खासदार विनायक राऊत यांचा जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या प्रती असलेल्या जिव्हाळा व आत्मियतेच्या वृत्तिची विशेष प्रशंसा केली. मतदार संघातील सर्वांबद्दल खासदार विनायक राऊत यांची कळकळ सर्व कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श असल्याचे प्रतिपादन सौ.शिल्पा यतीन खोत यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स