ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुणगे येथे गणेशोत्सवा निमित्त साहित्य वितरण.

मुणगे येथे गणेशोत्सवा निमित्त साहित्य वितरण.

प्रकाशन: 03 Sep 2022 02:54 PM
वाचन संख्या 46

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुणगे गावातील प्रभाग क्रमांक १ अंतर्गत आडबंदर, आपईवाडी, वाघोळीवाडी, कारिवणे वाडी मधील ग्रामस्थांना गणेशोत्सवासाठी मोदकाचे पीठ, नारळ, गूळ, अगरबत्ती, धूप, कापूर साहित्य वाटप नुकतेच करण्यात आले.
उपसरपंच श्री.धर्माजी आडकर, ग्रामपंचायत सदस्या सौ.रविना मालाडकर, सौ.अंजली सावंत आणि आडबंदरचे सुपुत्र, यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.आनंद मालाडकर यांनी सलग दुसऱ्या वर्षी सदर उपक्रम राबविला आहे. मंडळाच्या वतीने घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
मुणगे गावात सातत्याने सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच सौ.सायली बागवे, सरपंच सौ.साक्षी गुरव, पोलीस पाटील सौ. साक्षी सावंत, आरोग्यसेविका सौ. दुर्गा परब, बचत गटांचे पदाधिकारी आणि सर्व सदस्यांची कौतुकाची थाप नेहमीच पाठीशी असते.
अशी माहिती श्री.आडकर, सौ. मालाडकर, सौ.सावंत यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स